रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली
सकाळी १०.३० च्या सुमारास रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली असून या अपघातात एकून ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर त्यापैकी एकाचा जीव वाचला आहे.३४ कर्मचारी घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने बस निघाली होती. कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तसेच सकाळपासून या दिशेने बचाव पथके रवाना झाली आहेत. ३३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे अशीही माहिती स्थानिक आमदार गोगावले यांनी दिली.
महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांची मिनी बस प्रतापगड घाटात सकाळी कोसळली. रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली आहे, या बसमध्ये एकूण ड्रायव्हरसह ३४ जण होते. या ३४ जणांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेना आमदार भारत गोगावले यांनी दिली. हे सगळे कर्मचारी प्रामुख्याने दापोलीचे होते. दापोलीवर या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. ३४ पैकी एका प्रवाशाने बस कोसळत असताना उडी मारली त्यामुळे त्याचा प्राण वाचला. प्रकाश देसाई असे त्यांचे नाव आहे. बस कोसळत असताना त्यांनी या बसमधून उडी मारली. त्यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठात कळवले. या बसचा चेंदामेंदा झाला.