रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत रविवारी राष्ट्रपती आर्थिक जनतंत्र परिषदेचे उद्घाटन

(श्रीराम कांदु)

ठाणे दि १३: उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे रविवार १४ जानेवारी रोजी आर्थिक जनतंत्र परिषद( इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) चे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती डॉ रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होत आहे. सकाळी १०.३०  वाजता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सलन्स सेंटर सभागृहात हा कार्यक्रम होणार असून यासाठी राज्यपाल डॉ चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती असेल. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती असेल.

या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेन्चर कॅपिटल, स्टार्ट अप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० यशस्वी उद्योजक सुद्धा असतील.

या परिषदेचा समारोप अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमानंद खंडू यांच्या उपस्थितीत होईल. परिषदेच्या अधिक माहितीसाठी मिलिंद बेटावदकर ९८३३५०९२२२ तसेच मिलिंद चाळके ८८७९८९४६४९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email