राज ठाकरे व माझी ‘स्टाईल’ एकच : आमदार बच्चू कडू

(म.विजय)

पुणे दि.२९ – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड अभ्यासू आहेत आणि मी “फिल्ड वर्क’शी जोडलेला असल्याने भविष्यात त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीला माझ्या “फिल्ड वर्क’ ची जोड मिळाल्यास, राज ठाकरेंना सुद्धा राजकीय सूर गवसेल अशी आशा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

आमच्या पक्षांची ध्येय धोरण वेगळी असली तरी राज ठाकरे आणि माझ्या कामाची स्टाईल एकच असल्याने आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र येऊ शकतो असं संभाव्य भाकीत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सध्याच्या युती सरकारमध्ये आणि आघाडी सरकारमध्ये काहीच फरक नसल्याच सांगत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीमागील उद्देश हाच होता की, शहरी भागातील नैतृत्वाने ग्रामीण भागातील लोकांसाठी उभे राहावे आणि त्या निमित्तच माझी मनसे अध्यक्ष राज ठाकरें बरोबर सकारात्मक चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं. विद्यमान युती सरकार विरोधात लढण्यासाठी मी खूप गंभीर असून त्यासाठी अजून ६ ‘बच्चू कडूं’ची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं.

ग्रामीण भागातील लोकांसाठी शहरी नेतृत्त्व उभे राहावे, ही राज ठाकरे यांच्या भेटीचा उद्देश आहे. तशी सकारात्मक चर्चाही झाली. सरकारविरोधात लढण्यासाठी मी गंभीर आहे. मात्र, विधीमंडळात मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी आणखी सहा `बच्चू कडूं`ची गरज आहे. त्यांचा मी शोध घेत आहे. राज यांच्याबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी शहरी नेतृत्व उभे राहील का याबाबत चर्चा झाली. ”

आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपण जालन्यामध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. माझं उद्दिष्ट हे सत्ता मिळवणं नसून तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं आहे असं बच्चू कडू म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email