राज ठाकरे यांना भेटण्यासाठी तरुणाईची गर्दी!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना पाहता यावे, त्यांची भेट घेता यावी आणि त्यांच्यासोबत एखादी सेल्फी घेता यावी, यासाठी शेकडो तरुणांनी शासकीय विश्रामगृहावर गर्दी केली होती; परंतु वेळेच्या अभावामुळे राज ठाकरे यांनी दौरा आटोपता घेतल्यामुळे तरुणाईचा हिरमोड झाला. त्यांच्या स्वागतासाठी तरुणांनी आणलेले पुष्पगुच्छ तसेच परत न्यावे लागले.
चिमुकल्या कलावंताने दिले चित्र भेट!
राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांसोबतच कलावंतांनीसुद्धा मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांचा समर्थक सहावीत शिकणारा निसर्ग नितीन धारस्कर याने स्वत: हाताने काढलेले राज ठाकरे यांचे छायाचित्र त्यांना भेट दिले. यावेळी राज यांनी निसर्ग धारस्करच्या कलागुणांचे कौतुक केले.
Please follow and like us: