राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही – शरद पवार
पुणे दि.११ :- मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चांविरोधात मोर्चा काढला. आता मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलंय. यापुढे फार नाटकं केल्यास दगडाला दगडानं आणि तलवारीनं तलवार उत्तर मिळेल, अशा शब्दांत राज ठाकरे आझाद मैदानातल्या सभेतून बरसले.
राज ठाकरेंच्या या विधानावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांना लक्ष्य केलं. राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. काही जण त्यांचं भाषण ऐकायला येतात, तर काही जण त्यांना पाहायला येतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं अभिनंदन करताना भाजपावर तोफ डागली.