राज्य पोलीस दलातील 137 पोलिसांना राज्यपालांच्या हस्ते पदके प्रदान

पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक’ व‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते १३७ पोलीस पदकांचे वितरण करण्यात आले.
पोलीस पदक वितरणाचा‘अलंकरण समारंभ’ राज्यपालांच्या उपस्थितीत 27 मार्च 2018 नरिमन पाँईंट येथील टाटा थिएटर येथे पार पडला. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह‍ विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव,पोलीस महासंचालक सतीश माथूर,मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी,पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके व गुणवत्तापूर्ण सेवा पदके आज एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. यात 10 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली तर 127 पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस शौर्यपदक आणि पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

१० जणांना पोलीस शौर्यपदक
पोलीस शौर्यपदक भंडाराचे पोलीस निरीक्षक मनोहर हिरालाल कोरेटी,गडचिरोलीचे पोलीस नाईक नागेश्वर नारायण कुमरान, गडचिरोलीचे पोलीस शिपाई बापू किश्टयया सुरमवार, गडचिरोलीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक बस्तर लक्ष्मण मडावी, गडचिरोलीचे पोलीस नाईक दिलीप ऋषी पोरेटी, गडचिरोलीचे पोलीस नाईक देवनाथ खुशाल काटेगे, गडचिरोलीचे पोलीस नाईक दिनकरशाह बलसिंह कोरेटी,गडचिरोलीचे पोलीस शिपाई संजय लेंगाजी उसेंडी, गडचिरोलीचे पोलीस नाईक बाबुराव महारु पदा,गडचिरोलीचे पोलीस शिपाई प्रवीण हंसराज भसारकर.

१० जणांना उल्लेखनीय सेवेबददल राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक

राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र मधुकर कुलकर्णी, नियोजन व समन्वयचे अपर पोलीस महासंचालक व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण, विक्रीकर विभाग, दक्षता अधिकारी येथील अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल, पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त रवींद्र गणेश कदम,नाशिकच्या महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमीचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक नागेश शिवदास लोहार,बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त शशिकांत दत्तात्रय सुर्वे, पुणे शहराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त महादेव श्रीपती गावडे, वांद्रे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय लक्ष्मण कदम, औरंगाबाद शहराचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर मोहन थोरात, कोल्हापूरचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाप्पा इराप्पा मोर्ती.

पोलीस पदक प्राप्त अधिकारी- कर्मचारी 

सिडकोचे दक्षता अधिकारी अपर पोलीस महासंचालक विनय महादेवराव कारगांवकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ.छेरिंग दोरजे, सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त महादेव भिमराव तांबडे, बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त संजय वासुदेव जांभुळकर, राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती गट क्रं ९ चे सेवानिवृत्त समादेशक जानकीराम बंडुजी डाखोरे, सशस्त्र पोलीस ताडदेवचे सेवानिवृत्त पोलीस उप आयुक्त श्रीप्रकाश मारुती वाघमारे, नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य श्रीधर गोपाळराव खंदारे, मंत्रालय सुरक्षाचे सेवानिवृत्त पोलीस उपआयुक्त शांतीलाल अर्जुन भामरे,पालघरचे सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक भगवान गोपाजी यशोद,नांदेडच्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे सेवानिवृत्त अपर उप आयुक्त प्रकाश प्रभाकरराव कुलकर्णी, ठाणे शहराचे पोलीस उपआयुक्त डॉ.संजय हिंदुराव शिंदे, गुन्हे शाखा अंमलबजावणीचे पोलीस उपआयुक्त राजेंद्र गणपत दाभाडे,नागपूर शहराचे पोलीस उपआयुक्त रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी,दक्षताचे मुख्य संपादक सहायक पोलीस उपमहानिरीक्षक यशवंत नामदेव व्हटकर, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपआयुक्त बाळकृष्ण मोतीराम यादव, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त सुरेखा प्रताप दुग्गे, पुणे शहराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुनिल वामनराव खळदकर,पुणे शहराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त विजयसिहं रामकृष्ण गायकवाड, हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १२ चे सहायक समादेशक रशिद तुराब तडवी, नवी मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त नितीन चंपतराव कौसडीकर, पुणे शहराचे सहायक पोलीस आयुक्त संजय शामराव निकम, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल सदाशिव बाजारे, रायगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावता महादेव शिंदे,बृहन्मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गणपत सुर्वे, बृहन्मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल आनंदा वर्पे, नागपूर शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दिपक मेंहदळे, बृहन्मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष भास्कर दगडखैरे,राज्य राखीव पोलीस दलाच्या मुंबईच्या गट क्रंमाक 8 चे पोलीस निरीक्षक सतीश पांडुरंग क्षिरसागर,औरंगाबादच्या मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक फसियोददीन मोईनुददीन खान, पुणे शहराचे पोलीस निरीक्षक संजय भाऊसाहेब नाईक-पाटील, राज्य गुप्तवार्ता विभागाचे मुख्य गुप्तवार्ता अधिकारी प्रकाश मनोहर नलावडे,औरंगाबाद शहराचे सहायक पोलीस निरीक्षक शामकांत रामराव पाटील,बृहन्मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुबारक पटेल,बीडचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चंद्रकांत उबाळे, जळगांवचे सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक अरविंद देवमन देवरे, बृहन्मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक विष्णू त्रिबंकराव बडे, पुणे शहराचे पोलीस उप निरीक्षक हनुमंत भानुदास सुगांवकर, बृहन्मुंबईचे पोलीस उप निरीक्षक सखाराम दत्तु रेडेकर, बृहन्मुंबईचे पोलीस उप निरीक्षक राजन दत्तात्रय मांजरेकर,बृहन्मुंबईचे पोलीस उप निरीक्षक एकनाथ विष्णू केसरकर,बृहन्मुंबईचे पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब श्रीपती देसाई,बृहन्मुंबईचे पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पर्बती पवार,नागपूर लोहमार्गचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र सुधाकर झेंडे, अमरावती ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पुंडलीकराव होटे, रायगडचे पोलीस उपनिरीक्षक नारायण नामदेव वारे, लोहमार्ग मुंबईचे पोलीस उप निरीक्षक विदयाधर जयसिंग घोरपडे, नवी मुंबईचे पोलीस उप निरीक्षक दादा जगन्नाथ अवघडे, साताराचे पोलीस उप निरीक्षक आबासाहेब जिजाबा सुंबे,दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ पांडुरंग माळी,पुणे शहराचे पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब बबनराव भोर,बृहन्मुंबईचे पोलीस उप निरीक्षक विजय राजाराम आंबेकर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे गुप्तवार्ता अधिकारी संजय बाळाजी शिंदे,राज्य गुप्तवार्ता विभागाचे गुप्तवार्ता अधिकारी जयप्रकाश जगन्नाथ माने,नागपूर शहराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक भास्कर रामरावजी वानखेडे, बीडचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक भागवत किसनराव तपसे,भंडाराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक लियाकत अली मोहंमदअली खान, राज्य राखीव पोलीस दलाच्या पुण्याच्या गट क्रमांक 2 चे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष पिलोबा रणवरे, उस्मानाबादच्या लाच लुचपतप्रतिबंधक विभागाचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक दिलीप शिवराम भगत,दौंडच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रंमाक 5 चे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक शामवेल सदानंद उजागरे, पुणे शहराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक अरुण यशवंत बुधकर,नांदेडचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक प्रकाश गंगाधर तरोडेकर, पुणे शहराचे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ दत्तात्रय वाकसे, दौंडच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रंमाक 5 चे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक पुनाजी पांडुरंग डोईजड, बृहन्मुंबईचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत राजाराम सारंग, जळगांवचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण वामनराव पाटील, ठाणे शहराचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल दगडू पाटील, राज्य राखीव पोलीस दलाच्या पुण्याच्या गट क्रंमाक 1 चे सहायक पोलीस उपनिरीक्षक भर्तरीनाथ दामू सोनावणे, राज्य राखीव पोलीस दलाच्या दौंडच्या गट क्रंमाक 5 चे सहायक पोलीस उप निरीक्षक मधुकर अर्जुन भागवत,राज्य राखीव पोलीस दलाच्या दौंडच्या गट क्रंमाक 5 चे सहायक पोलीस उप निरीक्षक सतीश रंगनाथ जामदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या दौंडच्या गट क्रंमाक 7 चे सहायक पोलीस उप निरीक्षक हिम्मत लक्ष्मण जाधव, पुणे शहराचे सहायक पोलीस उप निरीक्षक राजेंद्र शरद पोहरे, राज्य राखीव पोलीस दलाच्या पुण्याच्या गट क्रंमाक 2 चे सहायक पोलीस उप निरीक्षक संभाजी खंडू पाटील,सांगलीचे सहायक पोलीस उप निरीक्षक विठठल यशवंत पाटील,ठाणे शहराचे सहायक पोलीस उप निरीक्षक तुकाराम दत्तु बांगर,लातूरचे सहायक पोलीस उप निरीक्षक उत्तम तुकाराम जाधव,पुण्याच्या मोटार परिवहन विभागाचे सहायक पोलीस उप निरीक्षक दामोदर सोनू मोहिते, जळगावचे सहायक पोलीस उप निरीक्षक शांताराम रामदास वानखेडे,गडचिरोलीचे सहायक पोलीस उप निरीक्षक अनिल मधुकर डांगट,ठाणे शहराचे सहायक पोलीस उप निरीक्षक संभाजी नारायण देशमुख,कोल्हापूरचे सहायक पोलीस उप निरीक्षक प्रकाश दत्तात्रय कोकाटे,अकोलाचे सहायक पोलीस उप निरीक्षक गंगाधर पंडीत चौधरी,ठाणे शहराचे सहायक पोलीस उप निरीक्षक संदिपकुमार भिकुराव रायकर, लातूरचे सहायक पोलीस उप निरीक्षक अशोक बाबुराव गायकवाड, पुणे ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिवराम झगडे, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नाणविज, दौन्ड येथील सहायक पोलीस उप निरीक्षक अरुण आत्माराम पोटे, लातूर येथील सहायक पोलीस उप निरीक्षक विद्याधर रंगनाथ टेकाळे, लातूर येथील साहायक पोलीस उप निरीक्षक जगन्नाथ देवीदा सूर्यवंशी,बीड जिल्ह्याचे मोटार परिवहन विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक कल्याण महादेव घोडके, सोलापूर शहरातील सहायक पोलीस उप निरीक्षक संजय जगन्नाथ खरात,मुंबई येथील रा. रा. पो. बल येथील गट क्र ८ चे सहायक पोलीस उप निरीक्षक हनुमंत सखाराम तुळसकर, पुणे शहरातील सहायक पोलीस उप निरीक्षक अशोक बजरंग कांबळे, रायगड येथील सहायक पोलीस उप निरीक्षक पांडुरंग शंकर खेडेकर, पुणे येथील बिनतारी विभागाचे सेवानिवृत्त पोलीस हवालदार प्रकाश लक्ष्मण बहम, पुणे शहरातील सेवानिवृत्त पोलीस हवालदार विलास कोंडीबा घोगरे, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार प्रदीप गजानन कडवडकर, पुणे शहरातील बिनतारी संदेश विभागाचे पोलीस हवालदार बबन विठ्ठल अढारी, मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अशोक मधुकर रोकडे,बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार रवींद्र भगवान मयेकर, नाशिक शहराच्या मोटार परिवहन विभागाचे पोलीस हवालदार हृदयनाथ नारायण साळवी, अमरावती शहराचे शारदाचरण हरिनारायण तिवारी,सोलापूर शहराचे पोलीस हवालदार संजय इरण्णा हुंडेकरी, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार राजू शामराव बनसोडे, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार प्रल्हाद उत्तम मदने,जळगावचे पोलीस हवालदार प्रदीप विश्वनाथ बडगुजर, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार रमेश पांडुरंग शिंदे, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार अरुण दादा जाधव, पुणे शहराचे पोलीस हवालदार रामदेव निवृत्ती रेणुसे, पुणे शहराचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संगीता वसंत सावरतकर, नाशिक शहरातील पोलीस हवालदार व्यंकटेश दिनकर कुलकर्णी,बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार राजेंद्र पाडुंरंग कारंडे, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार अशोक आनंदराव हुंबे,पुणे शहराचे पोलीस हवालदार बळवंत दत्तात्रय यादव, ठाणे शहराचे पोलीस हवालदार रमेश महादेव जाधव, रागयडचे पोलीस हवालदार मोहन पोशा मोरे, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार चंद्रकांत परबती शिंदे, बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार जयवंत चंद्रकांत संकपाळ,बृहन्मुंबईचे पोलीस हवालदार राजीव विष्णू जाधव आदी एकूण १३७ पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email