राज्य उत्पादन शुल्क विभागाची भिवंडीत कारवाई
(श्री राम कांदु )
ठाणे :दि.३० भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारिवली या ठिकाणी काल गुन्हा अन्वेषण भिवंडी विभाग आणि हिल लाईन परिसर येथे अंबरनाथ विभाग व मुंबई उपनगर के विभाग निरीक्षक यांनी संयुक्त कारवाई केली अशी माहिती ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक नाना पाटील यांनी दिली.
भिवंडीत दोन बेवारस गुन्ह्याची नोंद झाली असून या कारवाईत २ हजार ६०० लिटर रसायन आणि १ ढोल असा एकूण ६१ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत उल्हासनगर ५ येथे करण्यात आली त्यात एका बेवारस गुन्ह्याची नोंद झाली असून या कारवाईत ५९०० बॅरेल लिटर रसायन जप्त करण्यात आले असून एकूण २७ ड्रमची किमंत ४हजार २०० रुपये प्रमाणे १ लाख १३ हजार ४०० इतक्या किंमतीचा माल आणि २ ढोल आणि २० रिकामे ड्रम असा एकूण १ लाख २९ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे .जप्त करण्यात आलेल्या रसायनाची विल्हेवाट लावण्यात आली .