राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई :लाखोंचा माल जप्त

ठाणे-डायघर हद्दीतील देसाई गावातील खाड़ी किनारी चलणा-या तीन वेगवेगळया दारू निर्मितीच्या अडयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड़ टाकली. सदर धाड़ीची चाहुल लागल्याने तेथे काम करणा-यांनी पलायन केले असले तरी सदर कारवाईत १०६ रसायानाने भरलेले तर ३१ रिकामे ड्रम ,२१ हजार २०० लीटर दारू निर्मितीचे रसायन,एक मोठा ढोल असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाणे अधीक्षक एन.एन.पाटील, यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जीतेन्द्र पाटिल, पी.पी.घुले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम.टी.वरुळकर, जवान एस.डी.पवार, प्रदीप महाजन, शैलेश कांबले यांच्या पथकाने सदर कारवाई केली. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email