राज्यात प्लास्टिक वापरणा-यांवर कारवाई,दंडाच्या पावत्या वायरल
आज अर्थात २३ जून पासून संंपूर्ण महाराष्ट्रत प्लास्टिक बंदी अमलात आली आहे. कल्याण डोंबिवली , ठाणे , नाशिक , सोलापुर , पुणे , अशा विविध ठिकाणी प्रशासनाने कारवाई करत प्लास्टिकचा वापर करणा-यांं विरोधात कडक कारवाई केली. त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात आला असून अशा विविध ठिकाणच्या दंंडाच्या पावत्या सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. सदर पावत्यात पाच हजार रूपये दंडाची रक्कम दिसत असून अशा अनेक पावत्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच प्रशासन कारवाईसाठी सज्ज असल्याने प्लास्टिक चा वापर टाळण्याच्या दृष्टिनेही लोकं जागरूक होताना दिसत आहेत.
Please follow and like us: