राज्यातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

भिवंडी – तालुक्यातील मराडेपाडा दुगाड येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे भूमीपूजन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले . मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू भाऊ चौधरी व त्यांच्या सहकाऱयांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाप्रसंगी शरीर सौष्ठव व माजी भारत श्री सुहास खामकर , शिवभक्त सिनेअभिनेते ऍड सचिन गवळी , ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आमदार रुपेश म्हात्रे, आमदार शांताराम मोरे , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील , सुुभाष माने , राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते इरफान भुरे ,भिवंडी पंचायत समितीच्या उप सभापती वृषाली विशे, शिवसेनेचे पंचायत समिती गटनेते रविकांत पाटील यांच्यासह शेकडो शिवभक्त , नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
रविवारी तिथी प्रमाणे शिव जयंती उत्सवाचे आयोजन शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते . या शिवजयंतीची औचित्य साधून राज्यातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. ” राज्यातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे निर्माण भिवंडीतील मराडेपाडा या ठिकाणी होत असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या मंदिराचे भूमिपूजन माझ्याहस्ते झाले हे माझे भाग्य आहे , हे मंदिर तमाम शिव प्रेमींसाठी प्रेरणा स्थान असेल ” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी आपल्या भाषणात व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email