राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा पुन्हा अपघात टळला

(म विजय )

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेला हेलिकॉप्टर त्रासाचा ससेमीरा कायम आहे. आज मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग सुरु होतं. मात्र हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आलं, त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

आज भाईंदर येथे एस.के स्टोन चौकीजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील घोडबंदर इथल्या वर्सोवा पुलाच भूमीपूजन, तसेच इतर विकास कामांचंही भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी हे दुपारी एकच्या दरम्यान मुंबई येथील एक कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने भाईंदरच्या सेवन इल्वेन शाळेत उतरणार होते. त्यावेळी शाळेच्या इमारतीतून दुसऱ्या इमारतीवर केबलची वायर गेली होती. हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर पायलटला अचानक ती केबल दिसली. पायलटने हेलिकॉप्टर लॅंड होत असताना ते पुन्हा टेकऑप केलं.

जर हेलिकॉप्टर खाली आलं असतं, तर हेलिकॉप्टरच्या पंख्यात वायर अडकून अनर्थ घडला असता.

यावेळी हेलिकॉप्टरमध्ये नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री होते.

याप्रकरणी ग्राऊंड इंजिनिअरला निलंबित करण्यात आलं आहे. तर कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांनी मुंबईला रस्तेमार्गे रवाना होणं पसंत केलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email