राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेत ठाण्याच्या मुलांनी,जिंकली २१ सुवर्ण पदके

( श्रीराम कांदु )

ठाणे:औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेत  सरस्वती क्रीडा संकुलातील जिल्हा क्रीडा प्रशिक्षककेंद्रातील जिम्नॅस्टीक्स खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावून 21 सुवर्ण 4 रौप्य व 4 कास्य पदकाची लयलूट केली

मानस मानकवळे – 4 सुवर्ण 1 कास्य, आर्यन दवंडे – 1 सुवर्ण, सोहम नाईक – 4 सुवर्ण, 2 रौप्य, गरिमा शर्मा- 1 सुवर्ण,1 रौप्य,1 कांस्य, ऋचा देवळे-2 सुवर्ण,श्रेयस मंडलीक -2 सुवर्ण, पुर्वा किरवे -4 सुवर्ण, कार्तीक पाडवळकर- सुर्ण,1 रौप्य,1 कास्य, यश शिंदे -1 सुवर्ण,1 कास्य, साक्षी पिंपळे -1 सुवर्ण, केनीशाबरोलिया – 1 सुवर्ण 13 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत कोलकाता येथे होणा-या राष्टीय शालेय स्पर्धेकरीता मानस मानकावळे,आर्यन दवंडे,सोहन नाईक,गरिमा शर्मा, ऋचादेवळे,पुर्वा किरवे,कार्तीक पाडळकर,यश शिंदे या खेळाडुची निवड झाल्याचे मुख्य प्रशिक्षक महेंद्र बाभ्‌ळकर यांनी सांगीतले.

गेल्या 10 ते 12 वर्षापासुन मुख्य प्रशिक्षक श्री.महेंद्र बाभुळकर सहप्रशिक्षक कु.प्रणाली मांडवकर, जयेश कुरकरे यांचे मार्गदर्शनाखाली सरस्वती क्रीडा संकुलयेथे 50 जिम्नॅस्टीक्स खेळाडु दररोज 5 ते 6 तास कसुन सराव करतात. खेळाडूंचे सातत्य व मेहनत तसेच प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे संकुलनातीलखेळाडंची राज्य व राष्टीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केलेला आहे.आंतरराष्टीय दर्जाचे क्रीडा साहित्य व सुविधा व बंदिस्त क्रीडा  गृह उपलब्ध झाल्यासहेच खेळाडु आंतरराष्टीय स्तरावरही स्वत:ला  व देशाला सिध्द करतील असे महेंद्र बाभुळकर यांनी सांगितले. सरस्वती क्रीडा संकुलचे व्यवस्थापक सहानी सर व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनीअमृतवाड यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठीशुभेच्छा दिल्या.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email