राज्यसरकार घेते पालघरमधील अपघातग्रस्तांचे बळी.जिल्हा मुखालय पेक्षा रूग्णालयाची पालघर मध्ये गरज

पालघर मधील जनतेच्या तोंडाला पुसली पाने

अर्धाडजन आमदार असलेल्या जिल्ह्यात अपघाताने नागरीकांना आपले प्राण गमवावे लागतात हे जिल्ह्याचे अतिशय दुर्देव आहे.युतीचे सरकार क्रेंद्रात व राज्यात आल्यावर एकमागुन एक प्रकल्प पालघर जिल्ह्याच्या माथी मारण्यात आले परंतु एकही अद्यावत रुग्णालय पालघर जिल्ह्यात उभारणी करू शकले नाही .रस्त्यावर असलेले खड्डे, चुकीची वळणे,बेकायदेशीर चालणारी अवजड वाहणे,नियमबाह्य चालु असलेली रस्त्यांची कामे यामुळे अनेक ठिकाणी रोजच अपघात घडत आहेत.
पालघर जिल्ह्याचे मुखालयाचे काम करण्यासाठी शासनाने हजारो कोटींची जमीन सिडकोला देवुन त्याच्या बदल्यात जिल्हा मुखालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्याचा करार केला. परंतु जिल्ह्यातील जनतेसाठी अद्यावत रुग्णालय व्हावे असे कोणालाही वाटले नाही.एकीकडे कुपोषणाने जाणारे बळी तर पैसे नसल्याने उपचार न घेता येत असल्याने नागरीकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.राज्यसरकार गुजरातच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन साठी कोट्यवधी रूपयाचे देते अन उपचारा विना जिव गमविणाऱ्या जनतेला किड्या मुंग्या प्रमाणे मरण देत आहे.
जिल्हा मुखालयाच्या इमारती पेक्षा अगोदर रुग्णालयाची गरज जिल्ह्याला आहे.काही दिवसांपूर्वी अशाच रस्त्याच्या अपघात उपचार वेळेवर भेटला नसल्याने कुणबी समाजाचे कार्यकर्ते कपिल पाटील यांना आपला जिव गमवावा लागला.पाटील यांच्या निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंब पोरके झाले असुन संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.राज्यसरकार अपघातग्रस्तांचे बळी घेण कधी थांबवेल आणी अत्याधुनिक रुग्णालय उभारणी साठी जिल्हातील आमदार लक्ष देतील का हे पाहणे औचित्याचे ठरेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email