राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्या विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्याची भरली फी….

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२२ – आपण शिकतोय पण गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची आर्थिक स्थिती अडचण ठरू नये यासाठी एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या पोकेट मनीतून आपल्याच शाळेतील काही विद्यार्थ्याची फी भरली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडे फीची रक्कम सुपूर्द केली. राज्यमंत्री चव्हाण यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक करत या विद्यार्थ्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासारखा असल्याचे सांगितले.

ऋषभ संजय नयार हा १४ वर्षीय विद्यार्थी डोंबिवली पूर्वेकडील स.वा.जोशी शाळेत शिकतो. या विद्यार्थ्याने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याचे वडील संजय नायर हेही उपस्थित होते. ऋषभने आपल्या पोकेटमनीतील पैसे जमा करून आपल्याचे शाळेतील काही विद्यार्थ्यांची फी भरण्याचे ठरवले होते. राज्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थित हे समाजकार्य आपल्या हातून घडावे यासाठी ऋषभ याने वाढदिवसादिनी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे जमलेली रक्कम दिली.


राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती व लाभ जनतेला मिळवून देण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत जनसुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पूर्वेकडील सावरकर रोड येथील जनसंपर्क कार्यालय, पूर्व मंडळ कार्यालय, पश्चिम मंडळ कार्यालय,डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यालय, पश्चिमेकडील गुप्ते रोड येथील साई पॅराडाईस बिल्डींग येथे या केंद्राचे उद्घाटन राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यालयात उद्घाटनप्रसंगी डोंबिवली पश्चिम मंडळ शहर सचिव हरीष जावकर,नगरसेवक राजेश म्हात्रे, पवन पाटील, विभाग अध्यक्ष समीर कांबळी, वार्ड अध्यक्ष ओमकार बागडे, कार्यालयप्रमुख निलेश चौधरी यासह कार्यकर्ते केतन राणे, रविकांत मुंबरकर आणि जगदीश कदमआदी कार्यकर्ते उपस्थित होते. घरडा सर्कल येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून नगरसेवक विनोद काळण यांच्या पुढाकाराने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सार्वजनिक स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.


स.वा.जोशी शाळकरी मुले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बचत दिंडी काढणार आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील मराठा मंदिर सभागृहात गरजू व बचत गटातील महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी संधी देण्यासाठी मार्गदर्शन देण्यात आले. डोंबिवलीकर संस्कृतिक परिवारच्या दशकपूर्तीनिमित्त डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर युट्युब चॅनलचे उद्घाटन करण्यात येणार आले. रायगड जिल्ह्यात तळागाळातील लोकांसाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विमा योजना कवच काढण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email