राजसाहेबांनी मांडलेले अतिशय महत्त्वाचे मुद्दे:

डोंबिवलीतील पत्रकार परिषदेत मा. राजसाहेबांनी मांडलेले अतिशय महत्त्वाचे मुद्दे:
🔸पकल्याण-डोंबिवलीला ६५०० कोटींच पॅकेज देण्याची घोषणा झाल्यानंतर ते कितीदा कल्याण डोंबिवलीत आले?
🔸पपॅकेज देत बसलाय, हा काय साखरपुडा आहे का? एक तर पैसे नाहीत सरकारकडे आणि योजना जाहीर करत सुटलेत. मात्र भाजपचे हे बुडबुडे लवकरच फुटणार.
🔸प्रशासनाचं काम प्रशासन करत नाही मग हे अनधिकृत फेरीवाले माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हटवून दाखवले तर आमच्यावर खटले भरता, हद्दपारी लावता!
🔸त्यानंतरही फेरीवाले पुन्हा बसले यावर प्रश्न आम्हाला पण ही जबाबदारी प्रशासनाची त्यांना आणि सरकारला हे प्रश्न का विचारले जात नाहीत?
🔸लोकं स्वत:हून सांगतायत की एवढी मोकळी स्थानकं बघितली नव्हती म्हणून लोकं या आंदोलनावर खुश आहेत.
🔸रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने ३० ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या हद्दी ठरवून मग फेरीवाल्यांवर कारवाई करू असं आश्वासन दिलंय.
🔸माझी माध्यमांनाही विनंती आहे की तुमचाही दबाव या यंत्रणांवर वाढवा.
🔸जागतिक आर्थिक मंचाचा अहवाल आणि आपल्या शहरांमध्ये छटपुजेला होत असलेली गर्दी हे परप्रांतीयांच्या वाढलेल्या लोंढ्याच प्रतिक नाही का?
🔸घाटकोपर स्थानकाला एका खासगी कंपनीचं नाव दिलंय; स्थानकांची नावं बदलणं योग्य नाही.
🔸भाजपवाले विरोधी पक्षात होते तेव्हा सगळ्यांवर घाणेरडी टिका करायचे आणि भाजपवर टीका झाली की सेन्सोरशिप लावतायत.
🔸मोदींच्या विजयात निम्मा वाटा राहुल गांधींचाच होता.
🔸पण आज राहुल गांधींच्या सभांना गुजरातमध्ये गर्दी होतेय असं दिसतंय.
🔸गुजरातमध्ये मोदींचं भाषण सुरु असताना घोळक्याने लोकं सभेतून निघून जातायत, ही चित्र बोलकी नाहीत का?
🔸अशा विरोधी वातावरणातही भाजपच्या जागा वाढल्या तर तो चमत्कार ई.वी.एम. मशीनचा असेल.
🔸निवडणूक आयोग निवडणुका जाहीर का करत नव्हतं? जेव्हा दबाव वाढला तेव्हा आयुक्तांनी निवडणुका जाहीर केल्या. स्वायत्त संस्थेच हे वागणं योग्य नाही.
🔸वांद्रे रेक्लमेशन, बेहरामपाडा हे बांग्लादेशी मोहल्ले आहेत आणि ही त्यांची कच्ची बांधकामं पक्की करण्याकरता झोपडपट्ट्यांना आगी लावल्या जातायत.
🔸हे सत्ताधारी लोकांसमोर हिंदुत्वाच्या बाता मारतात आणि जेव्हा मोहल्ले-अड्डे वाढतात तेव्हा दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही शहरं बकाल झाली.
🔸अनधिकृत झोपड्या वाढल्या म्हणून आजपर्यंत कोणता अधिकारी निलंबित झाला?
स्थानिकांसाठी यंत्रणा दिरंगाई करणार आणि बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना सर्व सुविधा मिळतातच कशा?
🔸त्यानंतर बॉम्बस्फोट होतात, हल्ले होतात तरी आमचं प्रशासन सुधरत नाही.
🔸महाराष्ट्र पोलिसांवर माझा १००% विश्वास आहे. फक्त त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका. ते सर्व अनागोंदी सुरळीत करतील.
🔸त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार भूमिका घेणं क्रमप्राप्त असतं. एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उत्तम उदाहरण आहे.
🔸ब्रिटीशविरोधी लढ्यात सावरकर जेरबंद झाले होते. आणि जेव्हा महायुद्ध सुरु झालं तेव्हाच ब्रिटीशांचा कणा मोडावा म्हणून ब्रिटिशाविरुद्ध लढणाऱ्या हिटलरला भारताने पाठींबा द्यावा असं सावरकरांचं म्हणणं होतं.
🔸पण ज्यावेळेस त्यांना समजलं की इराणचा शहाने हिटलरला पाठींबा दिला आणि दोघांच्या सहमतीने त्या इराणच्या शहाची ताकद वाढेल. हाच इराणचा शहा अफगाणिस्तानमार्गे भारतात येईल आणि भारतीय मुसलमान त्याचे स्वागत करतील.
‘तेव्हा हा धोका भारताला परवडणारा नाही म्हणून भारताने आता ब्रिटिशांना पाठींबा द्यावा’ असं सावरकरांनी भारताला पत्र लिहून कळवलं आणि महत्त्वाचं म्हणजे सावरकर तेव्हा अंदमानमध्ये ब्रिटीशांची शिक्षा भोगत होते.
🔸परिस्थितीनुसार तुम्ही देशाभिमुख, राज्याभिमुख भूमिका घ्यायच्या असतात. असे आदर्श आपल्यासमोर असतानाही आपण काहीच बोध घेणार नाही का?
🔸आपल्या यंत्रणा-सत्ताधारी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना वाढवता आहेत.
🔸आणि हे उद्या अंगावर आले तर तुम्ही काय कराल? यांचे पायबंद कोण करेल?
🔸एक निश्चित हे घुसखोर अंगावर येतील ना तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आठवेल.
🔸निवडणुकांच्या तोंडावर मतांसाठी फक्त या पक्षांना हिंदुत्व आठवतं. इतकी वर्ष सत्ता आहे हातात मग झोपडपट्ट्यांमध्ये घुसखोर वाढले कसे?
🔸बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना सरकारांना आश्रय द्यायचाच असेल अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची वर्षमर्यादा एकदाची २०५० करून टाका.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email