राजकीय सूड भावनेतून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न : नगरसेविका डॉ. सुनीता पाटील

(करण हिन्दुस्तानी)

नगरसेवक महेश पाटील यांना राजकिय क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळत आहे .यामुळेच राजकीय सूड भावनेतून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.माध्यमांत येत असलेल्या उलटसुलट वृत्तामुळे मला खुलासा करणे भाग पडत आहे . असा खुलासा नगरसेवक महेश पाटील यांच्या भगिनी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
डॉ. सुनीता पाटील यांच्या या पत्रकात पुढील मजकुर देण्यात आला आहे, मी डॉ. सुनीता पाटील पेशाने डॉक्टर असून इथेच ग्रामीण भागात मी वैद्यकीय सेवा देत आहे . लोकांच्या आग्रहास्तव मी राजकीय क्षेत्रात उतरून आता मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही जनतेची सेवा करीत आहे .
माध्यमांत येत असलेल्या उलटसुलट वृत्तामुळे मला खुलासा करणे भाग पडत आहे .
माझे बंधू महेश पाटील हे सुद्धा सामाजिक कार्यात नेहमी पुढे असल्याने लोकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे . नगरसेवक म्हणून ते जनतेची सेवा करत आहेत . मी ठामपणे सांगू इच्छिते की माझ्या भावाने कुणाही गरिबाची सामान्य माणसाची कधीही पिळवणूक केलेली नाही , फसवणूक केलेली नाही . कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण केलेली नाही . त्यामुळेच लोकांच्या मनात आमच्याविषयी प्रचंड प्रेम आहे . अनेक समाजोपयोगी कार्यक्रमातील लोकांची प्रचंड उपस्थिती , त्यांचा सहभाग त्याची साक्ष आहे .
या प्रेमामुळे , लोकप्रियतेमुळे राजकिय क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळत आहे . यामुळेच राजकीय सूड भावनेतून कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोडसाळ वृत्तामुळे तपासयंत्रणेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे .
पोलिसांची कारवाई सुरू आहे. तपास सुरु आहे . आम्हाला विश्वास आहे की आमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. असे डॉ. सुनीता पाटील यांनी सदर पत्रकात म्हंटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email