त्या गद्दार ६ नगरसेवाकाना रस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे
( श्रीराम कांदु )
मुंबई: शिवसेना-मनसे मध्ये पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या पक्ष शोडून शिवसेने च्या शरण पत्कारणारे त्यां सहा नगरसेवकाना रस्त्यावर सहज फिरुन देऊ नका, असे आदेशच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.
या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.मनसेच्या फुटलेल्या सहा नगरसेकांच्या प्रभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर धाव घेतली. राज ठाकरे यांनी स्वत: या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन या फुटीबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण, त्यांची अवस्था शिवसेनेत वाईट होणार. घर का ना घाट का अशी अवस्था होईल. तुम्ही कामाला लागा, असे सांगत त्या पैकी एकालाही रस्त्यावर सहज फिरु देऊ नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.