रस्ता रूंदीकरणातंर्गत ३६ बांधकामावर महापालिकेचा हातोडा

(म.विजय)

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ता रूंदीकरणातंर्गत हाजुरी येथील 35 बाधित अनधिकृत बांधकामावर तसेच हरदासनगर येथील १ बांधकावर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या ही कारवाई करण्यात आली.
ठाणे शहरात हाजुरी, हरदासनगर आणि राम मारूती रोड, बाळकूम येथे रस्ता रूंदीकरणातंर्गत कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार आज तिन्ही ठिकाणी कारवाई सुरूकरण्यात आली.
या कारवाई अंतर्गत हाजुरी येथील ३५ बांधकामे संपूर्णत: निष्काषित करण्यात आली. त्याचबरोबर वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील हरदास नगर येथील डी पी रस्ता रुंदीकरणात अडथळा होणाऱ्या बेकरीचे बांधकामदेखील आज निष्कासित करण्यात आले.

उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी आणि अशोक बुरपल्ले यांच्या नियंत्रणाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार तिन्ही ठिकाणी सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता यांच्या समावेश असलेल्या पथकांनी पोलिस बंदोबस्तात sdr कारवाई केली.

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email