रस्ता ररुंदीकरणात घर गेल्यास वृद्धाने दिला आत्महत्येचा इशारा,मुख्यमंत्राकडे साकडे   

(श्रीराम कांदु )

डोम्बिवली- शहराचा विकास होत असताना  सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही ना याची काळजी प्रशासन घेत नसल्याचे उजेडात आले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील  राजू नगर ( गणेश नगर ) येथे रस्ता रुंदीकरणात एका  वृद्धाचे घर तुडणार आहे.  आपण रस्त्यावर येणार असून  आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही असे  त्या वृद्धाने  यांनी  सांगितले.  वृद्धाने मुख्यमंत्राकडे साकडे न्याय मिळल्यासाठी  साकडे घातले आहे. आता यात  पालिका काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
     यशंवत रामाजीराव शिंदे हे गेली ४० वर्ष राजू नगर ( गणेश नगर ) येथे राहतात. या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणार असल्याने तशी त्यांना पालिकेने नोटीस बजावली आहे. या ठिकाणी त्याचे ३  गाळे  असून ते भाड्याने दिले असल्याने त्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. पालिका प्रशासनाने याठिकाणी लाल रंगाने मार्किंग केल्याने यात त्यांची सर्व जागा जात आहे. आता पण बेघर होणार या भीतीने शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. रस्ता रुंदीकरणात माझं घर आणि गाळे जात असल्याने त्याबदल्यात मला पर्यायी जागा किंवा नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडेहि  केली आहे. परंतु शहराचा विकास करताना  वुद्ध व त्याचे कुटुंबीय बेघर  घर होणार आहे . याकडे या शासनाने  लक्ष देणे आवश्यक आहे.   आपण रस्त्यावर येणार असून  आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही असे शिंदे यांनी  सांगितले .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email