रविंद्र चव्हाणांना रायगड जिल्हयाच्या  पालकमंत्रीपदाची बक्षिसी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली  – राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची रायगड जिल्हयाच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्हयाचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत चव्हाण यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करीत महापालिकेत भाजपचं कमळं फुलवलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार पाडीत कोकणात भाजप वाढविण्याचे काम करीत आहेत.  त्यामुळेच त्यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाची बक्षिसी मिळाली असल्याचे बोललं जातय.

गृहनिर्माण मंत्री मेहता हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले होते. तसेच रायगड जिल्हयातील स्थानिक कार्यकर्ते व पदाधिका-यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती. तसेच अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यामुळेही वादात सापडले होते या सगळया कारणांमुळेच त्यांना पालकमंत्री पदावरून हटविण्यात आल्याचे बोललं जातय. रविंद्र चव्हाण यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचे राज्यमंत्रीपद आहेत.  रायगड जिल्हयातील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीतभाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणूक प्रभारी म्हणून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली हेाती. निवडणुकीच्या काळात चव्हाण यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केलं. माजी खासदार रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मेहनत घेत पनवेल महापालिका काबीज केली. चव्हाण यांच्या कार्यपध्दतीमुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तसेच ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हयाचं संपर्कमंत्री म्हणूनही चव्हाण यांच्यावर जबाबदारी आहे. रत्नागिरीत शिवसेनेला खिंडार पाडण्यात रविंद्र चव्हाण हे यशस्वी झाले होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष भय्याजी मलुष्टे, माजी पंचायत समिती सदस्य नदीम सोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश कृष्णाजी सावंत (राजापूर), डॉ. अभय धुळप, राजा हेगीष्टे, सुनील गजने, रामदास शेलटकर यांच्यासह रत्नागिरीतील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील कार्यालयात त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. कोकण परिसरात भाजप वाढविण्यासाठी मोठया प्रमाणात काम करीत आहेत. त्यामुळेच कॅबिनेट मंत्रयाकडील पालकमंत्रीपदाचा पदभार काढून, राज्यमंत्रयाकडे सोपविण्यात आल्याचे बोललं जातय.

रविंद्र चव्हाणांवर का सोपवली असेल जबाबदारी..
१ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मंत्री म्हणून ओळख..
२ पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी चोखपणे पार पाडीत महापालिकेत भाजपचं कमळं फुलवंल…
३ ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे संपर्क मंत्री म्हणून

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email