योग वर्गाचा सांगता समारंभ
(श्रीराम कांदु)
डोंबिवली : योग विद्या धाम, डोंबिवली माध्यमातून शहरातील पूर्व-पश्चिम विभगातील एकूण ७५ ठिकाणी महिनाभर योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. अभूतपूर्व कार्यक्रमाचा सांगता सोहळा रविवारी ११ फेब्रुवारी रोजी ब्राह्मण सभा, तिसरा मजला, टिळक रोड, डोंबिवली पूर्व येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. सदर कार्यक्रमात सलग १०३ तास योगासने करून जागतिक स्तरावर गिनिज बुकमध्ये विक्रम करणाऱ्या प्रज्ञा पाटील उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास डोंबिवलीकरांनी उपस्थित रहावे अशी विनंती संस्था अध्यक्षा अनुराधा जोशी यांनी केली आहे.
Please follow and like us: