‘युवा माहिती दूत’उपक्रमाचा १५ ऑगस्ट रोजी शुभारंभ

(श्रीराम कांदु)

ठाणे दि.१४ – ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे १५ ऑगस्ट रोजी नियोजन भवन सभागृहात सकाळी ९.३० वाजता होणार आहे. युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च शिक्षण विभागआणि तंत्र शिक्षण विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थींपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साहीतरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.

राज्यात ६ हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे २३ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान ५ ते ७ टक्के विद्यार्थी म्हणजे किमान १ लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे आणि जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email