युवा ऑलिम्पिक्स 2018 स्पर्धेतील पदक विजेत्यांचा पंतप्रधानांनी केला सन्मान
नवी दिल्ली, दि.२२ – अर्जेंटिना इथे झालेल्या उन्हाळी युवा ऑलिम्पिक्स 2018 या स्पर्धेतल्या पदक विजेत्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांना सन्मानित केले. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी एकाग्रतेने आणि अधिक कठोर परिश्रम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. यासाठी सरकार आवश्यक साहाय्य आणि सुविधा पुरवेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. युवा खेळाडूंनी आपल्या शाळांमधल्या आणि गावांमधल्या युवापिढीला खेळण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नांव उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल पदकविजेत्यांच्या प्रशिक्षकांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
Please follow and like us: