युपी वरुन बेकायदेशीर पिस्तूल ठाण्यात विक्री साठी आणणाऱ्या ईसमास अटक

(म.विजय)

ठाणे – यूपी आणि एमपी बोर्डरवरील बांदा येथील गावामधुन सहा पिस्तूल व १५ जीवंत काडतुस घेउन येणाऱ्या इसमास .खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ट पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व त्यांच्या टीमने चेंदणी कोळीवाडा कोपरी येथुन ताब्यात घेतले .
सामेन रसिक शेख (वय 23 वर्ष ) असे या ईसमाचे नाव आहे , तो विरार येथील रहिवाशी असुन तो सराइत गून्हेगार आहे , हया अगोदर कांदिवली येथे बेकायदेशीर पणे रिव्हॉल्व्हर विकताना त्याला अटक झाली होती , तसेच अंबरनाथ येथे त्याने रॉबरी केली होती , त्या प्रकरणात त्याला साडेतिन वर्षाची शिक्षा झाली होती , तो नुकताच 11 जानेवारी 2018 रोजी जेल मधून सुटून आला होता , सुट्ल्यावर त्याने परत गुन्हेगारीचा मार्ग अवलम्बला , जेल मधून सुटुन आल्यानंतर त्याने अजून काही जंणाना रीव्होल्वर विकल्याची शक्यता आहे , ही पकड्लेली सहा पिस्तौल त्याने कोणाला देण्यासाठी आणली होती , हया मध्ये कोणी गँगस्टार सहभागी आहे का ? ह्याचा काही घातपात करण्याचा इरादा होता का ? ह्याची सखोल चौकशी सुरु असल्याची माहीती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ) एन .टी .कदम यानी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email