यापुढे शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, उच्च न्यायालयाचा शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दणका

मुंबई –राज्य सरकारने शिक्षकांना पगार जमा करण्यासाठी मुंबै बँकेत खाते उघडण्याची सूचना केली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यालायात खटला सुरू होता. शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा सरकारचा निर्णय रद्द करत उच्च न्यालायाने यापुढे शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. शिक्षकांसोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगारही मुंबै बँकेत जमा करू नका, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.या प्रकरणी निकाल देताना उच्च न्यालायाने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खरडपट्टी काढली. विरोधी पक्षनेते असताना मुंबै जिल्हा सहकारी बँकेवर अनियमिततेचा आरोप करणारे आणि राज्यपालांपर्यंत तक्रार करणाऱ्या विनोद तावडेंनी शिक्षण मंत्री झाल्यावर याच बँकेत शिक्षकांना खाती कशी उघडायला लावली? हे न समजण्यासारखे आहे, असे ताशेरे ओढले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email