यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क लिडरशीप प्रोग्रामला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
(महेश शर्मा)
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क लिडरशीप प्रोग्रामला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित युवकांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. नेतृत्त्वगुण आणि नेतृत्त्वाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे, याबाबत बोलताना त्यांनी प्रभूश्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण दिले. सामान्यांना एकत्रित करून त्यांनी समाजाच्या शत्रूंविरूद्ध कसा संघर्ष केला, यावर त्यांनी भर दिला. नंदकुमार गायकवाड आणि संग्राम माळी या दोन युवकांनी शेती आणि बेकरी उत्पादन क्षेत्रात केलेल्या प्रेरणास्पद कार्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव सुद्धा केला.
Please follow and like us: