मोबाईल चोरी विरोधी पथका’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
(म.विजय)
कल्याण- कल्याण डोंबिवली शहरांतील वाढत्या मोबाईल चोरीच्या घटना पाहता अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिमंडळात सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली ‘मोबाईल चोरी विरोधी पथकां’ची निर्मिती केली. शहरातील वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बनवलेल्या पोलिसांच्या ‘मोबाईल चोरी विरोधी पथका’चा उल्लेखनीय कामाबद्दल गौरव करण्यात आला आहे. गेल्या ५ महिन्यात कल्याण आणि डोंबिवलीतील मोबाईल चोरी विरोधी पथकाने तब्बल ३५० हून अधिक गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास छडा लावत सुमारे ४८ लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहेत.
कल्याण डोंबिवली शहरांतील वाढत्या मोबाईल चोरीच्या घटना पाहता अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिमंडळात सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली ‘मोबाईल चोरी विरोधी पथकां’ची निर्मिती केली. परिमंडळ-३ कल्याण चे पोलीस उपायुक्त डॉ.संजय शिंदे,कल्याण येथील सहाय्यक पोलीस आयुक्त,दत्तात्रेय कांबळे, डोंबिवली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी अवघ्या काही महिन्यात अत्यंत चांगला असा तपास केला. डोंबिवली विभागाने ५ महिन्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे २२ लाख ८३ हजार रुपये किमतीचे १७१ मोबाईल हस्तगत केले आहेत,तर कल्याण विभागातील पथकाने वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे २५ लाखांहून अधिक किमतीचे २०३ मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याबद्दल या पथकातील पोलीस निरीक्षक एन.एम. पाटील, सहाय्यक निरीक्षक एस.व्ही.सानप, पोलीस उप निरीक्षक प्रशांत मोरे, हवालदार कोळी, पोलीस नाईक भोईर, देवकर, अभंग, वळवी, पाठारे, आणि पोलीस हवालदार जाधव, लोखंडे यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.