मोनोरेलला शॉर्टसर्किटमुळे आग,सेवा ठप्प,

( म विजय )

मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली. पहाटे स्थानकावर ही ट्रेन उभी असताना आग लागली. सुदैवाने गर्दी नसताना ही आग लागल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या आगीमुळे मोनोरेलची सेवा ठप्प झाली असून चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी ही आग लागली. मैसूर कॉलनी स्टेशनवर मोनोरेल उभी असताना या ट्रेनच्या मागच्या डब्याला अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचं लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आणि ४० मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email