मोटर सायकलचा अपघात : तीन जणांचे प्राण गेले

भिवंडी- लग्न ठरल्याच्या आनंदात आपल्या मित्राला जेवणाची मेजवानी देवून दुचाकीने घरी परतत असताना मोटर सायकलचा अपघात होवून त्यात तीन जणांचे प्राण गेले आहेत.
अरशद मिर्जा वय (23) बांग्लापुरा ;शोहिद अंसारी वय (20) गुलजार नगर, भिवंडी; समीर फारुख अंसारी वय (20) औरंगाबाद  अशी या मृत युवकांची का नावे आहेत. अरशद मिर्जा आणि शोहीद या दोन युवकांच लग्न जमलं होतं. अरशदचं २५ जानेवारी तर सोहितचं की २५ जानेवारीला लग्न होणार होतं.अरशद व शोहीद यांचा मित्र समीर अंसारी औरंगाबाद वरून आला होता. समीर अंसारीला घेवुन ते वाडा येथील एका हॉटलमध्ये जेवायला बुलेट या मोटर सायकलने गेले होते.रात्री उशिरा भिवंडीला परतत असताना बोरपाड़ा जवळ त्यांची बुलेट व कंटेनर यांची धड़क झाली.या अपघातात दोघांचा जागीच तर तिसर्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.सदर घटने मुळे या युवकांच्या कुटुंबावर दू:खाचा डोंगर कोसळला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email