मेडिकल सह किरणा दुकानात चोरी

कल्याण दि.११ – कल्याण नजीक असलेल्या मोहने येथे महात्मा फुले नगर शहा चाळीत राहणारे नितीन बोराडे यांचे याच परिसरात गिरीजा भवन इमारती मद्ये किराणा दुकानं आहे व फुले नगर येथे हरीश देशमुख यांचे सुरज मेडिकल आहे. बुधवारी रात्री हे दोघे आपआपल्या दुकाने बंद करून घरी निघून गेले होते. दुकानाला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोकड चोरून नेली. सकाळी दुकानं उघडल्या नंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले व त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.