मृत पत्नीच्या विरहाने पतीची आत्महत्या    

ठाणे –- पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा विरह सहन न झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे

तुकाराम वाघ (४५)  हे पत्नी कांताबाई हिच्यासोबत वसारगाव येथील पंडीत म्हात्रे यांच्या विटभट्टीवर ८ वर्षांपासून मजूरीचे काम करत होते. २ आठवडयांपुर्वी कांताबाई या झोपेत असताना त्यांना विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनामुळे तुकाराम हे चिंताग्रस्त राहत होते. बुधवारी शहापुर येथील शिंदु्रल गाव याठिकाणी कांताबाई यांच्या तेराव्याचा कार्यक्रम पार पडला. तो कार्यक्रम उरकून तुकाराम हे काम करत असलेल्या वसारगाव येथील विटभट्टीच्या ठिकाणी आले. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तुकाराम यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email