मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीची दाणादाण

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०७ – इतक्या दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू असनाऱ्या कल्याण डोंबिवली मध्ये काल रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली मध्ये चांगलीच दाणादाण उडवली. कल्याण डोंबिवली शहरातील सखल भागात पाणी साचले तर कल्याण रेल्वे स्थानक, कल्याण कोर्ट, ओक बाग, अहिल्याबाई चौक, शिवाजी चौक ग्रामिन भागातील नांदीवली,आदीवली ,डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात,एम आय डी सी भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत शहर संघटक मनोज राजे, दीपक शिंदे , केदार चाचे, सुशील पगारे , नगरसेवक रवी म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील परिसराची पाहणी केली . गेल्‍या २४ तासात सरासरी १०० मि.लि. इतक्‍या पावसाची नोंद झालेली आहे. महापालिका क्षेत्रात ४ वेगवेगळया ठिकाणी ड प्रभाग येथे – 3, ह प्रभाग परिसरात- 2, एम.आय.डी.सी .परिसरात-10 व आधारवाडी परिसरात- 7 झाडे कोलमडली.

कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या २४ तासात ५३ मिमी ची नोंद झाली तर सकाळ पासून १६८ मिमी पाउस तर आजमितीला तब्बल १००३ मिमी पाउसाची नोंद झाली आहे. काल रात्री पासून पावसाने चांगलाच जोर धरत कल्याण डोंबिवली व आसपासच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवली सह आसपासच्या ग्रामीण भागात पावसाने एक धुमाकूळ घातला. सतत कोसलणार्या या पावसाने कल्याण डोंबिवली सह आसपासच्या सखल भागात पाणी साचले. कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक मंदावली होती. तर कल्याण कोर्ट ,स्टेशन परिसर ,ओक बाग शिवाजी चौक ,आंबेडकर रोड ,अहिल्या बाई चौक ,आरटीओ मागील चाळी कोलशेवाडी बोगदा ,डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर ,एम आय दि सी परिसर ,ग्रामीण भागातील नांदिवली ,पिस्वली ,आडीवली ढोकली ,आजदे ,मिलाप नगर एसटी स्तंड समोर ,सागर्ली आदी परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. पाणी साचल्यानेकल्याण डोंबिवली मधील जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यावर हि पाणी साचल्याने वाहतूकीचा वेग मंदावल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या पावसात कल्याण डोंबिवली परिसरातील २१ झाडे कोलमडली तर नांदिवली येथील आर्य गुरुकुल शाळेलगत असलेला महावितरण चा पोल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोलमडला या घटनेत या पोल वरील वीज वाहिनीचा शॉक लागल्याने मुस्कान राजोरीया हि १७ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली. सुदैवाने शाळा सुटण्यास तासाभराचा अवधी असताना हि घटना घडली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. कल्याण तालुक्यातील मुरबाड रोड वरील उल्हास नदीवरील रायता पुलाला पाणी लागल्याने सुरक्षित तेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती. कल्याण खडवली पर्यटन केंद्राचे काम सुरू असताना दोन कामगार त्या ठिकाणी अडकले कल्यान तहसील विभागाच्या रेस्क्यू टीम ने बाहेर काढले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email