मुलगा पाहीजे म्हणून गरोदर महिलेला मारहाण

डोंबिवली – मुलगा पाहीजे म्हणून एका गरोदर महिलेला तिच्या पती, सासूने मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे .सदर पीडित महिलेच्या पतीने काल सायकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुलगा होत नसल्याचा राग मनात धरून जेवण न बनवल्याचा जाब विचारत तिला बेदम मारहाण केली .सदर पीडित महिलेने या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल   केली असून या तक्रारि नुसार पोलिसानी पती छोटू कुजनकर ,सासू शाहूबाई कुजनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

कल्याण पुर्वेकडील खडगोलवली परिसरात छाया कुंजनकर ही महिला आपला  पती व मुलीं सह राहते .घरकाम करत सदर महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते .या महिलेला दोन मुली असून ती पुन्हा गर्भवती राहिली होती तिच्या पतिने व सासूने तिच्याकडे मुलगाच पाहिजे असा तगादा लावला होता .यातून या  दोघांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. मंगळवारी सायकाळी तिची सासू शाहूबाई त्यांच्या घरी आल्या व तुला मुलगा झालाच पाहिजे नाहीतर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली .त्यानंतर बुधवारी सायंकाळी तिचा पती छोटू  घरी दारू पिऊन आला व व सदर महिला कामासाठी बाहेर जात असताना मुलगा झाला नाही याचा राग मनात धरून तिला जेवण का बनवले नाही असे विचारत शिवीगाळ करत तिला मारहाण केली .रोजच्या त्रासाला कंटाळून या महिलेने या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारि नुसार पोलिसानी पती छोटू कुजनकर ,सासू शाहूबाई कुजनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email