मुझफ्फर हुसेन यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
(म.विजय)
मुंबई,-ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांच्या निधनाने निर्भय पत्रकारितेला प्रखर राष्ट्रवादाचा आयाम देणारे ध्येयवादी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, हुसेन हे एक अतिशय व्यासंगी व्यक्तिमत्व होते. विविध चर्चित राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावरील त्यांचे अभ्यासू व निर्भीड लिखाण पत्रकारितेला उंचीवर नेणारे होते. त्यासोबतच अनेक राष्ट्रीय महत्वाच्या विषयांवरील त्यांची ठाम व समन्वयवादी भूमिका विवेकी समाजासाठी दिशादर्शक होती. दोन वर्षापूर्वीच हुसेन यांना राज्य शासनातर्फे लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
Please follow and like us: