मुजोर रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत घेतला चावा
कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील स्त्यावर बेशिस्तपणे पार्क करत वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या रिक्षावर कारवाई करणाऱ्या तीन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दोन मुजोर रिक्षा चालकांनी शिविगाळ करत त्याच्या हाताला चावा घेतल्याची घटना काल रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.
कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक मोहसीन अन्वर शेख हे काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचे काम करत होते .यावेळी स्टेशन समोरील दीपक हॉटेल येथील रस्त्यावर एक रिक्षा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी करण्यात आल्याने शेख यांनी सदर रिक्षा चालक संजय चौधरी याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले .त्यामुळे संतापलेल्या चौधरी याने शेख याना शिवीगाळ करत त्यांची कॉलर पकडली यावेळी शेख यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस कर्मचारी वाघ यांनादेखील त्याने शिवीगाळ करत हाताच्या अंगठ्याला चावा घेतला .तर याच दरम्यान शेख आणि वाघ यांच्या मदतीसाठी आलेल्या तखीक याला देखील चौधरी यांच्या साथीदार आकाश याने मारहाण करत तखीक यांच्या हाताल चावा घेतला . या प्रकरणी मोहसीन शेख याने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार संजय चौधरी व आकाश चौधरी या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: