मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावाचा केला पाहणी दौरा

अतिदुर्गम बोराळे गावाच्या विकासासाठी  ‘कृती आराखडा’ –  विवेक भीमनवार

ठाणे:  शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या बोराळे गावाला सोई-सुविधांनी समृद्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न केली जाणार आहेत. या गावाला भौतिक सुविधांनी विकसीत करण्यासाठी गावाकरिता लवकरच कृती आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी आज इथे दिली.  

भीमनवार यांनी आज या भागाचा दौरा करून गावाची परिस्थिती जाणून घेतली. गावातील महिला मंडळ , गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी संपूर्ण साहाय्य देखिल केला जाणार असल्याचेही त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. यावेळी प्रकल्प संचालक डॉ.  रुपाली सातपुते , उप मुख्य कार्यकारी  अधिकारी ( सा ) चंद्रकांत पवार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डी.  वाय. जाधव , जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे आदि अधिकारी उपस्थित होते.   

या गावाचा पावसाळ्यात तालुक्यापासून तब्बल चार महिने संपर्क तुडतो. ही बाब लक्षात घेऊन . विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलरच्या माध्यमातून वीज  , बोरवेल व विहीर बांधून पाण्याची मुबलक सोय  ,  वन विभागाच्या मदतीने पक्के रस्ते  ,आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून कृषी व पशुसंवर्धन , नरेगाच्या सरकारी योजनेंतर्गत तरुणांना तसेच महिला बचत गटांना रोजगाराचे साधन निर्माण करणे आदि काम हाती घेण्यात येणार आहेत . शिवाय गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. वन विभाग , वीज महावितरण , बीसएसएनएल कंपनीची मदत गावाच्या विकासासाठी घेण्यात येणार आहे.

इथे असणाऱ्या डिजिटल शाळेला  हॅन्ड वाॅश स्टेशन , मुख्य अंगणवाडी , समाज मंदिर देखिल उभारण्यात येणार असून याबाबतचे नियोजन केला जाणार आहे. गावात दूरध्वनी संपर्क व्हावा याकरिता टॉवरची उभारणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी शहापूर गट विकास अधिकारी सुशांत पाटील , ग्रामसेवक क्षीरसागर , बीसएसएनएलचे अधिकारी , गावातील सरपंच आणि इतर विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email