मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची नाभिक समाज संघटनेची मागणी
( श्रीराम कंदु )
दौंड येथील एका जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्यबाबत राज्यात नाभिक समाज संघटनेने निषेध नोंदविला आहे. डोंबिवलीत संघटनेच्या वतीने शनिवारी बंद पुकारला होता. संघटनेने तहसीलदार आणि रामनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संघटनेने पुकारलेल्र्या बंदला शिवसेनेने पाठींबा दिला आहे.
याबाबत नाभिक समाज संघटनेचे डोंबिवली अध्यक्ष रमेश राऊत म्हणाले , नाभिक समाजापासून कुणालाही कसलाही त्रास नसताना मुख्यमंत्र्यानी या समाजाबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्या वक्तव्यबाबत मुख्यमंत्र्यानी समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे. अन्यथा नाभिक समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. दरम्यान डोंबिवलीत सुमारे ४०० केशकर्तनालये यांची दुकाने बंद होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनाही निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना पदाधिकारी तुषार शिंदे उपस्थित होते.