मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवलचे नागपूर येथे उदघाटन केले

(महेश शर्मा)

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवलचे नागपूर येथे उदघाटन केले. केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, राज्यातील मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, श्री. जयकुमार रावल आणि युपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ यावेळी उपस्थित होते. अशाप्रकारचे आयोजन हा अतिशय चांगला उपक्रम आहे. यामुळे नागपूरच्या संत्र्याला जागतिक ओळख मिळेल. संत्रा उत्पादकांच्या हाती अधिक पैसा येण्यासाठी त्यांना शाश्वत बाजारपेठेची सुध्दा निकड आहे. यामुळे तोही उद्देश साध्य होईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज प्रक्रिया उद्योग ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून शीतगृह, लॉजिस्टीक आणि उत्तम दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या जाणार आहेत. मिहानमधील प्रक्रिया उद्योग, नोगा ब्रॅन्डचे पुनरूज्जीवन असे अनेक उपक्रम येणाऱ्या काळात हाती घेतले जाणार आहेत. हा महोत्सव दरवर्षी होईल आणि सरकार त्याला संपूर्ण सहकार्य करेल, असे ते म्हणाले. संत्रा संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला 2 कोटी रूपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email