मुख्यमंत्री यांचे उपस्थितित कागल को-ऑप बँक लि.चे नामकरण राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक लि.

( महेश शर्मा )

शतक महोत्सवानिमित्त कागल को-ऑप बँक लि.चे नामकरण राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक लि. म्हणून करण्याच्या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मंत्री श्री चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणतीही बँक ही त्या भागात समृद्धी आणण्यास मदत करीत असते. महाराष्ट्रात सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी सहकारी क्षेत्राने मोठा हातभार लावला आणि हा सन्मार्ग आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी दाखविला. मात्र दरम्यानच्या काळात या सहकाराला बदनाम केले गेले. त्या क्षेत्राला पुन्हा स्वच्छ आणि भक्कम करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. विविध उपाय केले जात आहेत. 70:30 चे सूत्र स्वीकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ज्याद्वारे 30 टक्के नफा हा कारखान्यांना शेतकऱ्यांना द्यावाच लागेल. सर्वाधिक एफआरपीदेखील महाराष्ट्रात दिला गेला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email