मुका असल्याचे भासवून घरात घुसून ३० हजारांचा मुद्देमाल लंपास – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०८ – मुका बहिरा असल्याचे भासवत मदत मागण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात घुसून घरातील ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील शास्त्री नगर सुखसागर बिल्डिंग मध्ये राहणारे कवलदिश नागपाल हे राहत असलेल्या इमारती मध्ये शुक्रवारी सकाळी नवू वाजण्याच्या सुमारास एक तरून मूक बधीर असल्याचे भासवत मदती मागण्याच्या बहाण्याने आला. त्याने नागपाल यांच्या घरात मदतीच्या बहाण्याने घुसून हातचलाखीने त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून एकूण ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी नागपाल यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email