* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबई पोलिसांना देणगी स्वीकारता येणार, ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’च्या स्थापनेस परवानगी – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
Uncategorized

मुंबई पोलिसांना देणगी स्वीकारता येणार, ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’च्या स्थापनेस परवानगी

( म विजय )
मुंबई पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आता मुंबई पोलिसांनी ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे मुंबई पोलिसांना खासगी संस्था आणि उद्योग समुहांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी स्वीकारता येणार आहे.
परदेशात पोलीस दलाला देणग्या स्वीकारता येतात. याच धर्तीवर मुंबई पोलिसांनाही खासगी संस्था आणि उद्योग समुहांकडून देणग्या स्वीकारता याव्यात, यासाठी ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गृह विभागाला ऑगस्टमध्ये केली होती.
पोलीस आयुक्तांच्या पत्राची दखल घेत गृहखात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्ट स्थापन करण्यास परवानगी दिली. गृह खात्याने सशर्त परवानगी दिली आहे. देणगी स्वीकारताना हितसंबंध आड येणार नाहीत, विश्वासार्हता असलेल्या संस्था आणि व्यक्तींकडूनच देणग्या स्वीकारता येतील, तसेच निधी स्वीकारताना पोलीस दलाच्या कामाशी तडजोड करु नये, अशी अटही गृहखात्याने ठेवली आहे. ट्रस्टच्या नियमांची विधी विभागाने पडताळणी केल्यावरच ट्रस्टची नोंदणी करावी, असेही गृह विभागाने स्पष्ट केले.
निर्णयाची माहिती देताना पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर म्हणाले, ट्रस्टचा कारभार पारदर्शक असेल आणि तो सर्वसामान्यांसाठी त्याची महिती उपलब्ध असेल. तसेच देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेच्या विश्वासार्हतेवर शंका आल्यास देणगी नाकारण्याचे अधिकारही ट्रस्टला असतील. पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य, गृहनिर्माण, कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण यावर ट्रस्टचा भर असेल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *