मुंबई एयरपोर्टने स्वताचाच विक्रम मोडला
मुंबई एयरपोर्ट हा सगळ्यात व्यस्त सिंगल रनवे एयरपोर्ट आहे. असे असतानाही २० जानेवारीला २४तासात मुंबई एयरपोर्ट वर ९८० फ्लाइट्सचे लँडिंग व उडडाण झाले. यातून मुंबई एयरपोर्टने स्वताचाच विक्रम मोडला आहे.या आधी ६ डीसेंबरला या एयरपोर्टवर ९७४ फ्लाइट्स उतरल्या होत्या.यानंतर मुंबई एयरपोर्ट आता ब्रिटन येथील दूसरे मोठे एयरपोर्ट गेटविक एयरपोर्टच्या लँडिंग व अराइवल क्षमतेच्या जवळ पोहोचले आहे.गेटविक एयरपोर्ट जगातील सर्वाधिक कार्यकुशल सिंगल रनवे एयरपोर्ट आहे. मुंबई एयरपोर्ट भारताचा दूसरा सर्वात मोठा हवाईअड्डा आहे.यूके एयरपोर्ट कॉर्डिनेशन लिमिटेडच्या आकड्यांनुसार गेटविक सिंगल रनवे ची २०१८ च्या उन्हाळ्यात रोज ८७० फ्लाइट्सची क्षमता होती.परंतु गेटविक एयरपोर्ट फ्लाइट्सचे नियंत्रण १९ तास करते तर मुंबई एयरपोर्टवर २४ तास काम चालते.