मुंबईहून निघालेली खासगी बसचा अपघात ६ जणांचा मृत्यू तर १० जण जखमी

हुबळी दि.१७ – मुंबईहून निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग 63 वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात आज सकाळी झाला असून या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मृत प्रवासी मुंबईतील असून ते खासगी बसनं कर्नाटकला जात होते. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email