मुंबईत झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू
मुंबई – पावसामुळे झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळील एम.जी. रोड येथे घडली. मेट्रो सिनेमाजवळ एम.जी. रोड येथे आझाद मैदानाला लागून असलेले हे झाड संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान कोसळले. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जखमी आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीन जण किरकोळ जखमी झालेत.
Please follow and like us: