मी काही आठवड्यात तुमच्यासोबत असेन-मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट केला आहे.यात आपण सुखरुप असून आपल्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. काल गोव्यात भाजपचं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असून यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु आहेत.सदर व्हिडिओत २०१९ साली होणा-या लोकसभा निवडणुकित मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचं त्यांनी सर्वांना आवाहन केलं.तसेच. “माझ्यावर सुरु असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यात तुमच्यासोबत असेन”, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email