मीरा रोडमध्ये हुक्का पार्लरवर छापा नऊ जणांना ताब्यात
घर भाडय़ाने घेऊन त्यात हुक्का पार्लर सुरू करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. मीरा रोडमधील हटकेश परिसरातल्या बहुमजली इमारतीत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घालून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मीरा भाईंदर शहरातील हुक्का पार्लर विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्यानंतर हुक्का पार्लर चालकांनी पोलीस कारवाईतून वाचण्यासाठी आगळीच शक्कल लढवली आहे
हटकेश येथील गौरव एक्सेलेन्सी या इमारतीच्या १४ व्या माळ्यावरील एका घरात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. या घरावर धाड घालून पोलिसांनी हुक्का तसेच सुगंधी तंबाखू जप्त केला. यावेळी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले.
Please follow and like us: