मिशन साहसी – अभाविप देणार ५,००० हुन अधिक कॉलेज विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण

अभाविप कल्याण जिल्हा आणि तायक्वांदो असोसिएशन (ठाणे) यांनी सयुक्तिकरीत्या ३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान ‘मिशन साहसी’ ह्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड येथील ५,००० हुन अधिक कॉलेज विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स म्हणजेच स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आज डोंबिवली येथिल मॉडेल कॉलेज मधे विद्यार्थिनींना मिशन साहसी या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनय भोळे सर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. मॉडेल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. काणे मॅडम, वुमन डेव्हलपमेंट सेलच्या कुलकर्णी मॅडम, अभाविप कोंकण प्रांतचे मिहिर देसाई, कल्याण जिल्हा संयोजक अमोल साळुंके, विद्यार्थीनी प्रमुख राखी बारोड, ज्ञानेश्वर पवार, सतीश चव्हाण उपस्थित होते.
काल दि. 3 ऑक्टोबर रोजी मुरबाड येथील न्यू इंग्लिश कॉलेज येथे ७५० हुन अधिक विद्यार्थिनींच्या सहभागाने प्रांतमंत्री अनिकेत ओव्हाळ ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या उपक्रमास सुरुवात झाली.
विद्यार्थिनींची छेड काढायचा कोणी प्रयत्न केल्यास अथवा हल्ला केल्यास त्या पासून स्वतः चा बचाव कसा करावा, पेन, आय डी कार्ड, रुमाल इ. साहित्य वापरून स्वतः चे रक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक ह्या ट्रेनिंग मधे विद्यार्थिनींना देण्यात येत आहे. विद्यर्थिनींचे आत्मबल वाढावे, स्वतः बद्दल विश्वास जागृत व्हावा ह्या साठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
१६ ऑक्टोबर रोजी कल्याण मधील बिर्ला कॉलेज मधे प्रशिक्षण घेतलेल्या ५००० विद्यार्थिनींचा मेगा डेमोंस्ट्रेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यर्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमास लाभत आहे.
मॉडेल कॉलेज, वंदेमातरम कॉलेज, महात्मा गांधी कॉलेज, साकेत कॉलेज, बिर्ला कॉलेज, एस. इ.एस. गर्ल्स कॉलेज, आदर्श कॉलेज, भारत कॉलेज, जी. आर. पाटील कॉलेज इ. कॉलेज ह्या उपक्रमात सहभागी होत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email