मित्रा सोबत पोलीस तक्रार करण्यास गेला म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देत केली मारहाण 

कल्याण- आपल्या मित्रा सोबत पोलीस स्थानकात तक्रार करण्यात गेला म्हणून चार जणांनी एक तरुणाला मारहाण केल्याची घटना डोंबिवली उमेश नगर परिसरात  घडली आहे .या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात रोहन म्हात्रे ,ऋषी पवार, विशाल पानवलकर,आकाश पाटील या चार जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
               डोंबिवली उमेश नगर परिसरातील संदेश म्हात्रे हे काही दिवसांपूर्वी आपला  मित्र तेजस सोबत विष्णुबनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवन्यास गेले होते .यांचा राग मनात धरून रविवारी रात्री संदेश आपले कार्यकाय बंद करून मोटरसायकल ने  डोंबिवली स्टेशन च्या  दिशेने जात असताना ते उमेश नगर चौक येथे पोचताच अचानक रोहन म्हात्रे ,ऋषी पवार, विशाल पानवलकर,आकाश पाटील या चार जणानी त्यांना गाठले .यावेळी रोहन याने संदेश च्या गळ्यावर सुरा धरत इतर तिघांनी ठोशाबुक्यांनी मारहाण करत तू तेजस सोबत तक्रार करण्यास का गेला ?तू आमच्या नादाला लागू नको नाहीतर तूला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत तेथून निघून गेले .या प्रकरणी संदेश यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारि नुसार पोलिसानी रोहन म्हात्रे ,ऋषी पवार, विशाल पानवलकर,आकाश पाटील या चार जणा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email