मित्रासोबत फिरण्यास गेल्याने तरुणाने केली मैत्रिणीला मारहाण
कल्याण दि.११ – सदर पिडीत तरुणी कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात राहते. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती आपल्या मित्रासोबत तिच्या घरी गेल्याने संतापलेल्या तिच्या दुस-या मित्राने त्यांना आपला घरी बोलवले. हे दोघे त्याच्या घरी गेल्या नंतर त्याने या दोघांना मारहाण केली इतकेच नव्हे तर दरवाजाच्या कदिने सदरमुलीवर हल्ला केला. प्रकरणी सदर पिडीत १७ वर्षीय मुलीने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मारहाण करणा-या नवनाथ माने विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.