माहुली पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांचा होणार शाश्वत विकास ; डॉ. जगदीश पाटील

ठाणे जिल्ह्याला मिळणार एक नाविन्यपूर्ण पर्यटन केंद्र

माहुली कृषी केंद्राचे झाले उद्घाटन ; वेबसाईटही कार्यान्वित

 ठाणे – माहुली कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होणारा विकास हा इथल्या स्थानिक नागरिकांसाठी शाश्वत विकास असणार आहे. काळाची गरज ओळखून विकासासाठी उचलण्यात आलेल हे पाऊल असल्याचे मत कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी व्यक्त केले. शहापूर येथील माहुली कृषी केंद्र उद्घाटन सोहळा तेसेच पर्यटन वेबसाईट कार्यान्वित समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. जगदीश पाटील , जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर , मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार ,उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर , ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना जगदीश पाटील म्हणाले की, कोकणाचा जीवमान उंचावण्यासाठी जेंव्हा प्राधान्यक्रम ठरवला त्यात पर्यटन विकासाला प्रामुख्याने महत्व दिले. कारण  पर्यटन हे जगातील हे एकमेव असे प्रचंड रोजगार क्षमता निर्माण करणारे क्षेत्र आहे. माहुली इथे येणारा पर्यटक हा हंगामी न राहता तो बारमाही कसा येईल या दृष्टीने या भागाचा विकास करण्यात यावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पात  सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी या निमित्ताने केले.

स्थानिक तरुणांचे कौशल्य वाढविणार

 जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले की , या पर्यटन केंद्राचा कामकाज सुसूत्र पद्धतीने सुरु राहण्यासाठी आगामी काळात कमिटी स्थापन केली जाईल. तसेच २७ गावातील गावकऱ्यांसाठी उपजीविकेचे साधन निर्माण करता येईल त्यादृष्टीने या पर्यटन केंद्राचा विकास केला जाईल. इथले गावकरी यासाठी प्रशासनाला उत्तम साथ देत असून पावसाळ्यात दुर्दैवी होणाऱ्या घटना टाळण्यासाठी संरक्षण निधी उपलब्ध केला जाईल असेही सांगितले. पुढे ते म्हणाले या भूमितल्या तरुणांच्या अंगी असणाऱ्या कौशल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांनी कौशल्य विकास योजनेची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उप वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी निसर्ग संपदेचा वापर करून राज्यातील एक नाविन्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्र साकारला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल मारपकवार , मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी केंद्राच्या विकासाला शुभेच्छा दिल्या.

वेबसाईटवर माहिती उपलब्ध

पर्यटकांना या केंद्राची माहिती व्हावी , पर्यटकांची पावलं वळावीत त्यादृष्टीने www.mahulitourism.in पर्यटन वेबसाईट देखिल कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती ग्रीन फिल्ड संस्थेचे संस्थापक अमोल गोऱ्हे यांनी दिली. गेली अनेक माहुली गडावर निस्वार्थी सेवा देणारे गुरुनाथ आगिवले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे , शहापूर तहसीलदार रविंद्र बाविस्कर , गटविकास अधिकारी सुशांत पाटील , गट शिक्षणाधिकारी आशिष झुंझारराव , ग्रामस्थ , पत्रकार उपस्थित होते. 

असे असेल हे केंद्र

राज्यातून अनेक गिर्यारोहक याठिकाणी येतात. शिवाय पळसगड, भंडारगड आणि माहुली हे किल्ले पादाक्रांत करण्यासाठी पर्यटक येत असले तरी या भागात सुविधा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. हीच अडचण लक्षात घेऊन या किल्ल्याच्या पायथ्याच्या माहुली गावाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.या ठिकाणी भक्त निवास, तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था, पंधरा मिनिटांची वनभ्रमंती आणि साहसी खेळांचे केंद्र विकसित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात या किल्ल्याच्या पायथ्याचा परिसर संपूर्णपणे पर्यटन केंद्रामध्ये रूपांतरित होणार आहे. नाविण्यपूर्ण योजनेतून या उपक्रमास १८ ते १९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

लो रोप कोर्सेस, हाय रोप कोर्सेस, रायफल शूटिंग, धनुर्विद्या अशा खेळांबरोबरच विविध साहसी खेळांचा याठिकाणी समावेश असेल. तर भविष्यात रोलर कोस्टल झीप लाइन आणि अॅडव्हेंचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येणार आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email